शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतच्या प्रशासक मंडळावर भाजपाचीच छाप

By admin | Updated: January 12, 2017 02:23 IST

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर एका शासकीय अधिकाऱ्यासह १३ सदस्यीय

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर एका शासकीय अधिकाऱ्यासह १३ सदस्यीय प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी सोशल मीडियामध्ये वायरल झालेल्या यादीतील ४ संचालकांना नवीन यादीतून वगळण्यात आले आहे. या यादीतही सर्व जण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच स्थान देण्यात आले असून, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला याही वेळी डावलण्यात आले आहे.तत्कालीन संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहारामुळे गेली पाच वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय संचालक मंडळाची आज घोषणा करण्यात आली. शासकीय अधिकारी व पात्र व्यक्तींचे अशासकीय सदस्यांचे प्रशासकीय मंडळ अधिनियम, नियम व पोटनियम यास अधीन राहून कारखान्याचे कामकाज पाहावे व केलेल्या कामकाजाचा वेळोवेळी अहवाल सादर करावा, असा आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग, पुणे यांनी या संचालकांना दिलेल्या पत्रात दिला आहे. या प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून विशेष लेखापरीक्षक पी. आर. घोडके या शासकीय आधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : दादासाहेब बबन सातव (आव्हाळवाडी), गणेश भगवान कुटे (आव्हाळवाडी), केशव रामभाऊ कामठे (फुरसुंगी), संदेश आनंदराव काळभोर (कदमवाकवस्ती), पूनम सागर चौधरी (सोरतापवाडी), पांडुरंग रामचंद्र काळे (थेऊर), चित्तरंजन त्रिंबक गायकवाड (कदमवाकवस्ती), बाबासाहेब ज्ञानोबा शिंगोटे (मांजरी बुद्रुक), गोरख देवराम ससाणे (हडपसर), अतुल सुभाष परांडे (धानोरी), संदीप मारुती लोणकर (मुंढवा) व शिवाजी गंगाराम चांधेरे (वडगावशेरी) या १३ जणांचा प्रशासकीय संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.या प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले पी.आर. घोडके हे विशेष लेखापरीक्षक, शासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. दादासाहेब सातव हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य असून गणेश कुटे हे हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. केशव कामठे हे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी यांचीही नियुक्ती संचालक मंडळावर करण्यात आली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी ज्येष्ठ संचालक पांडुरंग काळे यांचाही समावेश संचालक मंडळात करण्यात आला आहे. भाजपाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांचाही समावेश आहे.