शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बारा मतदारसंघांत भाजपा

By admin | Updated: October 19, 2014 23:40 IST

मावळमध्ये संजय ऊर्फ बाळा भेगडे, शिरूरमधील बाबूराव पाचर्णे या ग्रामीण भागातील २ तसेच दौंडमधील मित्र पक्ष रा.स.प.चे उमेदवार राहुल कुल यांची अशा ३ जागांवर वर्चस्व निर्माण केले.

पुणे : भारतीय जनता पक्षाने २१पैकी पुणे शहरातील ८ आणि चिंंचवड, शिरूर, मावळ या अन्य ३ तसेच मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने दौंडमध्ये जिंंकलेली जागा अशा १२ जागांवर विरोधकांचा नि:पात करून घवघवीत यश संपादन केले आणि जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तथापि ग्रामीण भागातील ३ मतदारसंघ वगळता इंदापूर, खेड आळंदी, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी तिसऱ्या तर भोसरी, भोर व पुरंदर या मतदारसंघात भाजप चौथ्या क्रमांकावर आहे.मावळमध्ये संजय ऊर्फ बाळा भेगडे, शिरूरमधील बाबूराव पाचर्णे या ग्रामीण भागातील २ तसेच दौंडमधील मित्र पक्ष रा.स.प.चे उमेदवार राहुल कुल यांची अशा ३ जागांवर वर्चस्व निर्माण केले. प्रारंभी केवळ मावळपुरता मर्यादित असलेला भाजप १० वर्षांपूर्वी शिरूर मतदारसंघात यशस्वी झाला. आता पुन्हा शिरूर-हवेली मतदारसंघ या पक्षाच्या ताब्यात आला असून दौंडमध्ये या पक्षाच्या मित्रपक्षाने मुसंडी मारल्याने या पक्षाची ग्रामीण भागात ३ पॉकेट्स निर्माण झाली आहेत. शहरात भाजपने नेत्रदीपक यश संपादन केले असले तरी ग्रामीण भागातील ३ मतदारसंघ वगळता इंदापूर, खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी तिसऱ्या तर भोसरी, भोर-वेल्हा मुळशी व पुरंदर या मतदारसंघात भाजप चौथ्या क्रमांकावर आहे.खडकवासला या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दुहीमुळे पोटनिवडणुकीत यशस्वी झालेल्या भाजपला यंदा पाय रोवण्याची संधी मिळाली. या मतदारसंघातील भाजपचे अस्तित्व तसे तुरळक असताना वर्चस्व निर्माण करून या पक्षाने राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. चिंंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देऊन भाजपने हाही मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)