शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपा

By admin | Updated: February 25, 2017 02:23 IST

विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आहेत. यापूर्वी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी

मंगेश पांडे, पिंपरीविधानसभा मतदारसंघाचा विचार करता, पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आहेत. यापूर्वी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे आमदार होते. असे असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. सात प्रभागांतील २८ जागांपैकी १२ जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. या मतदारसंघात शिवसेनेला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्राधिकरण, आकुर्डी, शाहूनगर, खराळवाडी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी हा परिसर येतो. महापालिकेचे सात प्रभाग या विधानसभा मतदारसंघात येतात. सात प्रभागांतील एकूण २८ जागांपैकी १२ जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि ३ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. गत महापालिका निवडणुकीत अवघ्या तीन जागा भाजपाला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत केवळ पिंपरी विधानसभा मतदारसंघात चारपट अधिक जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. आझम पानसरे यांना भाजपात घेतले. हे पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपाच्या पथ्यावर पडले आहे. चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्राबल्य आहे. भोसरीत आमदार महेश लांडगे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपाच्या दृष्टीने पिंपरी विधानसभा महत्त्वाचा होता. तेथे प्राबल्य असलेल्या आझम पानसरे यांच्या भाजपा प्रवेशाने पिंपरीतील उणीवसुद्धा भरून निघाली. तिन्ही मतदार संघात त्या त्या शिलेदाराने खिंड लढविल्याने भाजपाला हे यश संपादन करणे सुलभ झाले. पारंपरिक कट्टर शत्रुत्व असलेल्या आमदार जगताप आणि आझम पानसरे यांना एकत्रित आणण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरली. राष्ट्रवादीची बलस्थाने आपल्याकडे वळविण्याची किमया भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी यशस्वी करून दाखवली.