शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची रिपाइंबरोबरची युती कायम

By admin | Updated: February 15, 2017 02:35 IST

भाजपाकडून रेश्मा भोसले, सत्यभामा साठे, छाया वारभूवन या तीन अपक्ष उमेदवारांना पक्षाकडून मंगळवारी पुरस्कृत करण्यात आले.

पुणे : भाजपाकडून रेश्मा भोसले, सत्यभामा साठे, छाया वारभूवन या तीन अपक्ष उमेदवारांना पक्षाकडून मंगळवारी पुरस्कृत करण्यात आले. त्यापैकी प्रभाग २९ मध्ये कमळ चिन्हावर पक्षाच्या सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी मिळाली असतानाही त्यांच्याऐवजी रिपाइंच्या सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.प्रभाग ७ ड मधून रेश्मा अनिल भोसले, प्रभाग २९ अ मधून सत्यभामा साठे, प्रभाग २६ अ मधून विजय वारभूवन यांना पक्षाकडून पुरस्कृत करण्यात आल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, नितीन कांबळे, सागर राठोड, असिफ मोमीन, कृष्णा सातभाई, जावेद खान, शरद शिंदे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी रेश्मा भोसले यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्जात पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस तर एबी फॉर्म भाजपाचा अशी विसंगती आढळून आल्याने त्यांना अपक्ष उमेदवार ठरविण्यात आले आहे. हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतरही त्यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक २९ अ मध्ये भाजपाकडून सरस्वती शेंडगे या भाजपाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. मात्र त्यांच्याऐवजी रिपाइंच्या अपक्ष उमेदवार सत्यभामा साठे यांना पक्षाकडून पुरस्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेंडगे यांच्याकडे अधिकृत कमळ चिन्ह असतानाही त्यांच्याऐवजी सत्यभामा साठे यांच्या करवत चिन्हाचा प्रचार भाजपा करणार आहे.गिरीश बापट यांनी सांगितले, ‘‘प्रभाग २९ अ मध्ये सरस्वती शेंडगे यांना पक्षाकडून डमी अर्ज भरायला सांगितला होता, त्यानंतर पक्षाने सत्यभामा साठे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली होती. मात्र त्यापूर्वी शेंडगे यांनी एबी फॉर्म जमा केला असल्याने त्यांची भाजपाची उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली नसल्याने त्यांच्याऐवजी सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.’’ (प्रतिनिधी)