शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस वर्धापनदिनाला भाजपाचे पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी महापौर मुरलीधर मोहोळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाच्या महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत काँग्रेस भवनमध्ये सोमवारी दुपारी हजेरी लावली. ‘राष्ट्रवादी’च्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे प्रशांत बधे, अजय मोरे हेही नंतर आले. ‘प्रेम नसले तर नसू, द्या पण वैर नको. हीच पुण्याची खरी संस्कृती आहे,’ असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.

सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह भला मोठा ताफा घेऊन खासदार बापट काँग्रेसभवनात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली मारणे तसेच नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सरचिटणीस रमेश अय्यर, रविंद्र माळवदकर व काँग्रेसचे अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

बापट यांनी थोड्याच वेळात हास्यविनोदाची मैफलच काँग्रेस भवनच्या आवारात जमवली. “प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी काम करत असतोच. ते करताना मतभेद होत राहणारच, पण ते वैचारिक असावेत. वैयक्तिक आयुष्यात आपण एकमेकांचे मित्र असायला हवे. वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही आपण परस्परांच्या सुखदु:खात सहभागी होत असतो. ते तसेच कायम राहिले पाहिजे,” असे बापट म्हणाले.

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे अजय भोसले, प्रशांत बधे हेही नंतर आले. पक्षाच्या आवारात असलेल्या काँग्रेसच्या वाटचालीची १३५ वर्षे या छायाचित्र प्रदर्शनाची खासदार चव्हाण यांनी आवर्जून पाहणी केली. खासदार चव्हाण यांनी त्या काँग्रेसमध्ये असतानाच्या आठवणी सांगितल्या. कोणतेही आंदोलन, मोर्चा झाला की त्यावेळी नगरसेवक असलेले रमेश बागवे सर्वांना चॉकलेट, गोळ्या देत असत. त्याहीवेळी आपण खाऊन झाले की त्याचे कागद एकत्रीत जमा करा व टाकून द्या असे सांगत आवार स्वच्छ राहील याची काळजी घेत असू असे चव्हाण म्हणाल्या.