शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपा-राष्ट्रवादी समसमान

By admin | Updated: February 14, 2017 02:18 IST

पुणे महापालिकेच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यासाठी ज्योतिषतज्ज्ञांनीही अभ्यास सुरू केला असून, पुण्यात भारतीय जनता पक्ष

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यासाठी ज्योतिषतज्ज्ञांनीही अभ्यास सुरू केला असून, पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस समसमान असल्याचे मत व्यक्त केले आहे. मतदानाच्या दिवशीचे (२१ फेब्रुवारी) ग्रहमान पाहता, ज्योतिषाचार्य पं. नंदकिशोर जकातदार यांनी हे मत व्यक्त केले आहे.मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल. ९५ ते १०० जागा सेनेला मिळून भाजपाला ६५ ते ७० जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जकातदार म्हणाले, ‘‘दर निवडणुकीमध्ये आपण केलेले भाकीत खरे ठरत आले आहे. २०१२च्या निवडणुकीबाबत केलेला अंदाज ८८ टक्के बरोबर आला होता. या शास्त्राचा आधार म्हणजे राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास, उमेदवारांच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांची स्थिती, कोणत्या पक्षाने किती जागा लढविल्या याचा अभ्यास या सर्वांची टक्केवारी करून २०/२० असे १०० गुण दिले जातात. ग्रह उच्च राशीत असेल, तर पूर्ण गुण देऊन अंदाज काढला जातो. दर दोन तासांना कुंडली बदलत असल्याने मतदानाच्या दिवसाच्या कुंडलीचा दर दोन तासांनी विचार करून अंदाज बांधला जातो.या अंदाजामध्ये १० टक्के फरक पडू शकतो, कारण सर्वच उमेदवारांच्या कुंडल्या आमच्याकडे नसतात. राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून पुण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे, असे जकातदार यांनी सांगितले. कुंंडल्यांच्या अभ्यासासाठी मालती शर्मा, मेघश्याम पाठक, शाल्मिरा कुंड आणि अरुंधती पोतदार यांची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. होरामार्तंड उदय साने म्हणाले, ‘‘मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या महापालिकांमध्ये भाजपाच्या जागा सर्वाधिक असू शकतील. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस असेल. पुणे शहरात भाजापच्याच जागा अधिक असतील, असे भाकीत आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी किंवा शिवसेना आणि नंतर काँग्रेस, मनसे यांना जागा मिळू शकतील.’’ कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची आकडेवारी सांगण्यास मात्र साने यांनी नकार दिला.प्रसिद्ध ज्योतिषी सुहास डोंगरे म्हणाले, ‘‘भाजपाला पुण्यात सर्वाधिक जागा मिळू शकतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसना जागा मिळतील. गुरू कन्येत आणि शनी धनु राशीत असण्याचा हा परिणाम असू शकेल.