शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, नांदे येथे आढळला बर्ड फ्लूचा विषाणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:10 IST

मुळशी तालुक्यातील सूस-नांदे रस्त्यावरती एका खासगी कुटुंबाने राहत्या घरालगत घरगुती स्वरूपाचा कोंबडी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. तेव्हा काही ...

मुळशी तालुक्यातील सूस-नांदे रस्त्यावरती एका खासगी कुटुंबाने राहत्या घरालगत घरगुती स्वरूपाचा कोंबडी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. तेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या या छोट्या पोल्ट्रीतील चार ते पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. परंतु तो प्रकार त्यावरच न थांबता त्यांच्या दररोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. तेव्हा याबाबतीत त्यांना काहीतरी वेगळी शंका वाटू लागली म्हणून पोल्ट्री मालकाने मागील चार दिवसांपूर्वीच आपल्या मृत कोंबड्याची तपासणी ही औंध येथील प्रयोगशाळेत करून घेतली होती. परंतु दुर्दैवाने त्या तपासणीदरम्यान त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूच्या विषाणूमुळे झाला नसल्याचा अहवाल त्यांना आला. मात्र, तरीही त्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे न थांबता त्यांच्या मरण्याचे प्रमाण हे वाढतच राहिले. तेव्हा मात्र त्या मृत कोंबड्यांचे आणखी काही नमुने हे तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले. तर त्याचा अहवाल हा नुकताच रात्री उशिरा आला असून, त्यामध्ये ज्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तो मृत्यू हा बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा या आलेल्या या अहवालामुळे संपूर्ण मोशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

या सर्व घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नांदे येथील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते म्हणाले की, नांदे गावातील शिंदेमळा येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या ठिकाणी जवळपास तीनशे कोंबड्या असून त्या सर्वांची विल्हेवाट लावण्यात येईल याचबरोबर संसर्ग झालेल्या या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्यादेखील नष्ट केल्या जात आहे. तसेच, या परिसरातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे.

नांदे गावातील या दुर्दैवी घटनेनंतर नांदे ग्रामपंचायतीने तातडीने मदतीची पावले उचलली असून त्यांच्या वतीने जेसीबी व अन्य आवश्यक सामग्री ही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याविषयी माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की, आम्ही नांदेगाव परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना आमच्या वतीने सूचना देण्याचे काम सुरू केले असून जेसीबीच्या साह्याने तातडीने खड्डा घेऊन संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.