शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भिशीच्या नावाखाली कोट्यवधींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

गुजरातमधून घेतले ताब्यात : ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : ...

गुजरातमधून घेतले ताब्यात : ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : भिशीच्या नावाखाली ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असणाऱ्या बापलेकास पाकिस्तान सीमारेषा भुज, कच्छ (गुजरात) येथे जाऊन लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या वर्षभरापूर्वी जवळपास ५०० जणांना या बाप-लेकांनी भीशीच्या नावाखाली गंडा घालून फरार झाले होते.

भरतकुमार चरणदास जोशी व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी (रा. सहयोगनगर, भुज, कच्छ, गुजरात) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर अंतर्गत सन २०१३ ते सन २०१९ या कालावधीमध्ये ऊरुळी कांचनमधील एल. सी. जोशी ॲन्ड कंपनी, हिरेन ट्रेडिंग कंपनी, ओंकार ट्रेडर्स व दीपक टी सप्लायर्स या कंपनीचे मालक भरतकुमार चरणदास जोशी व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी यांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षांच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरून व आर.टी.जी.एस.ने रक्कम घेऊन त्यांना कसल्याही प्रकारचा आकर्षक परतावा परत न देता तसेच त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली.

काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेशाद्वारे तसेच रोखीने घेऊन त्यांना परत न देता एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केली. यामुळे ज्ञानेश्वर नारायण काळभोर (रा. धुमाळ मळा रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २५ सप्टेंबर २०२० ला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.