शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मोठय़ा भावाचा खून

By admin | Updated: December 9, 2014 00:08 IST

अनैतिक संबंधामध्ये भावाचा अडथळा येत असल्याने थोरल्या भावाचा खून केला. ही घटना खेड तालुक्यातील औदर गावाच्या टपालवाडीमध्ये शनिवारी रात्नी दहाच्या सुमारास घडली.

राजगुरुनगर : अनैतिक संबंधामध्ये भावाचा अडथळा येत असल्याने थोरल्या भावाचा खून केला. ही घटना खेड तालुक्यातील औदर गावाच्या टपालवाडीमध्ये शनिवारी रात्नी दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 
भाऊ नथू मेदगे (वय 42) याचा त्याचा धाकटा भाऊ हरिदास मेदगे (वय 26) याने डोक्यात आणि मानेवर घाव घालून खून केला. 
याबाबत भाऊचे वडील नथू पाटीलबुवा मेदगे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
नथू मेदगे यांचा भाऊ नावाचा मुलगा मुंबई येथे डबेवाले म्हणून अनेक वर्षे काम करीत होता. त्याच्यासोबत त्याची प}ी अलकाबाई आणि मुले राहत होती. भाऊ मेदगे यास दारूचे व्यसन होते. 
तो व्यवसायाचे सगळे पैसे दारूत घालवायचा म्हणून त्याला 1 वर्षापूर्वी गावी बोलावून घेतले आणि धाकटा हरिदास याला डबे देण्याचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईला पाठविले.
 भाऊ काही महिने टपालवाडी येथे गावी आल्याच्या काळात हरिदास  याचे अनैतिक संबंध जुळले. 
कुटुंबियांना समजल्याने त्यांचे मोठे भांडण झाले होते. त्यानंतर  पुन्हा भाऊ आणि दुसरा भाऊ कुंडलिक यांना व्यवसायासाठी मुंबईला पाठविले. (वार्ताहर)
 
4टपालवाडी येथे दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने मुंबईहून भाऊ आणि कुंडलिक टपालवाडी येथे आले होते. रात्नी 9 वाजता  घरातील सर्व मंडळी घराला बाहेरून कुलूप लावून कीर्तन ऐकण्यासाठी गेली. भाऊ मेदगे हे दारू पिल्याने घरातच झोपले होते. 
4हरिदास मेदगे याने भाऊ घरी एकटे झोपल्याची संधी बघून घरातील मागचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि भाऊचा डोक्यात घाव घालून खून केला. नथू मेदगे यांची नात रात्नी घरी आल्यावर तिने भाऊला रक्ताच्या थारोळ्यात पहिले आणि घरच्यांना जाऊन सांगितले. हरिदासने वडिलांना 8 दिवसांपूर्र्वी मी भाऊला मारणार, असे म्हटले होते.