शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांवर भोर पोलिसांचा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

महूडे : भोर शहरात व ग्रामीण भागातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटनस्थळी गर्दी करण्यास बंदी करण्यात ...

महूडे : भोर शहरात व ग्रामीण भागातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटनस्थळी गर्दी करण्यास बंदी करण्यात आली. मात्र, असे असतानाही अनेक पर्यटकांनी भोर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी केली. जवळपास १७० पर्यटकांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडून ८५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

भोर पोलीस ठाण्यातर्फे भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे तसेच मास्क न वापरणारे, विनामस्क गर्दीत वाहन चालविणारे, विनाकारण फिरणारे, पर्यटनस्थळांवर बंदी असताना वीकेंडच्या दिवशी १७० जणांवर कार्यवाही करण्यात आली. पर्यटनस्थळांवर बंदी असतानाही पळवाट काढीत होते. शेजारील गावातील आहे, असे सांगून पोलीस कर्मचाऱ्यांशी पर्यटक हुज्जत घालत होते. यावेळी १७० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भोरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार, बळीराम सागले, अशोक खुटवड पोलीस नाईक अनिल हिप्परकर, सुभाष गिऱ्हे, अप्पा हेगडे, जाधव, अमोल मुऱ्हे, शिवाजी काटे, राहुल मखरे, प्रमिला निकम, चव्हाण, दामिनी दाभाडे, होमगार्ड इत्यादी उपस्थित होते.

चौकट

पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी आहे. शासन नियमांचे पालन करावे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये. तसेच मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना करून ही नागरिक फिरताना दिसत होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली.

फोटो : विनामास्क व विनाकारण फिरणारे यांच्यावर कार्यवाही करताना पोलीस कर्मचारी.