शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर नाझीरकर याला फसवणूक प्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:10 IST

बारामती : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या नगररचनाकार सह संचालक हनुमंत नाझीरकर यांचा ...

बारामती : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या नगररचनाकार सह संचालक हनुमंत नाझीरकर यांचा मुलगा भास्कर नाझीरकर याला बारामती तालुका पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली. त्याला आज बारामती न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली, अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीखक महेश ढवाण यांनी दिली.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खेड-शिवापूर टोलनाक्यावरुन शनिवारी रात्री भास्कर नाझीरकर याला ताब्यात घेऊन बारामती तालुका पोलिसांच्या हवाली केले.

जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने भास्कर नाझीरकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे ही कारवाई केली. बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी हनुमंत नाझीरकर यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर, मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर (रा. स्वप्नशील्प अपार्टमेंट, कोथरूड, पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंदकुले या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल केला होता. याबाबत संग्राम तानाजी सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. ९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामतीत विद्युत मंडळाच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रवीण यांच्या नावे बनावट नोटरी भाडे करार व भाडेपट्टा तयार करत ती खरी आहेत. असे भासवून नाझीरकर व पोंदकुले यांनी ती कागदपत्रे बारामतीतील विद्युत मंडळ कार्यालयात दाखल केली. विद्युत पुरवठा कायम राहावा म्हणून त्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. प्रवीण यांच्या नावे बनावट भाडेपट्टा तयार करत विद्युत मंडळाविरुद्ध मनाई मिळावी यासाठी तो बारामती न्यायालयात वापरला होता. याप्रकरणी तिघांविरोधात भादंवि कलम ४६७, ४७१, ४७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने गीतांजली नाझीरकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़