शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

भारती रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हल्ला

By admin | Updated: March 31, 2017 03:34 IST

उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालीत डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना कात्रज येथील

पुणे : उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालीत डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना कात्रज येथील भारती रुग्णालयामध्ये गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या नातेवाइकांनी डॉक्टरांना खुर्च्या फेकून मारण्याचाही प्रयत्न केला. रुग्णालयाकडून माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस रुग्णालयात धावले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी पांडुरंग लक्ष्मण खळदकर व राहुल लक्ष्मण खळदकर (रा. सर्व्हे. १६, आंबेगाव पठार) यांना अटक केली आहे. प्रवीण रघुनाथ जाधव (वय ४१, रा. दामोदर रेसिडेन्सी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखी आणि घाम येत असल्यामुळे मंदा लक्ष्मण खळदकर (वय ५८) यांना मंगळवारी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. फिर्यादी जाधव हे भारती रुग्णालयात कार्यालय पर्यवेक्षक म्हणून काम करतात. मंदा यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. (प्रतिनिधी)खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तसेच योग्य उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. रुग्णालयाचे डॉ. श्रीराज पवार यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. दुसरे डॉ. सुमीत जगताप हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करीत होते. आपले शूटिंग केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकच आक्रमक होत खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जगताप यांच्या पाठीवर हाताने मारण्यात आले.