शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा रोकड लांबविण्याचा कर्मचार्‍यानेच केला बनाव आरोपींना पोलीस कोठडी : महावितरणचा ऑपरेटर मुख्य सूत्रधार

By admin | Updated: May 14, 2014 02:43 IST

भरदिवसा महावितरण कर्मचार्‍यांच्या डोळयात मिरचीपूड टाकून रोकड लाबंविण्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीपी मशीनचा ऑपरेटरच या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याचे उघड झाले असून त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : भरदिवसा महावितरण कर्मचार्‍यांच्या डोळयात मिरचीपूड टाकून रोकड लाबंविण्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीपी मशीनचा ऑपरेटरच या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याचे उघड झाले असून त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निलायम टॉकीज समोरील अजंठा लॉज समोर शुक्रवारी हा प्रकार घडला होता. मंगेश प्रभाकर बडसकर (वय २३ रा. वाघजाई मंदिराजवळ,जनता वसाहत), प्रविण शामराम शिंगे (वय २२ रा. शेळकेनगर, कोंढवा) असे अटक केलेल्यांची नावे असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धिरज दत्तोबा रानवडे (वय २० रा. दांडेकर पुल), महेश सुरेश जांभुळकर (वय २१ रा. दांडेकर पुल) यांना अद्याप अटक झालेली नाही.याप्रकरणी अविनाश नामदेव चव्हाण याने फिर्याद दिली होती. एमएसईबीच्या निलायम टॉकीज जवळील एटीपी मशीनमधील कॅश जमा करण्याचे काम फिर्यादी चव्हाण कडे होते तर प्रविण शिंगे हा मशिनचा ऑपरेटर आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे दोघांनी २ लाख ३३ हजार रुपयाची कॅश व विविध बँकेचे ५३ चेकचा भरणा करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकीवरुन आलेल्या तिघा-चौंघानी त्यांना अडवून दोघांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणात शिंगे हा जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास करुन एटीपी मशीनचा ऑपरेटरच याचा मुख्य सुत्राधार असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन तपास केले असता, आपल्या तीन मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे त्याने कबुल केले. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निबांळकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, कर्मचारी सचिन ढवळे, प्रमोद कळमकर, संजय भेगडे, तानाजी निकम आदींनी ही कारवाई केली.