शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लसनिर्मितीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीची रंगीत तालीम सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुण्यातील मांजरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेक या कंपनीचे काम अंतिम टप्यात आले असून, प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या देशात अपेक्षित प्रमाणात कोरोना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने नवीन निर्मितीकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. कागदोपत्री परवानग्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लसनिर्मितीसाठी लागणारे वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशमुख यांनी सांगितले, कंपनी व्यवस्थापनाबाबत प्रशासकीय पातळीवरील अन्न व औषध प्रशासन (एफडीए), महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ (एमएसीबी), प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि इतर विभागांकडून ना-हरकत परवानग्या देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीला यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन जाणून घेत तांत्रिक दुरुस्त्यांची कामे सुरू आहेत. कंपनीच्या हैदराबाद येथील मुख्यालयातून तज्ज्ञांचे पथक पाहणीसाठी आले होते. त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत. दरम्यान, किरकोळ तांत्रिक व्यवस्थापन होईपर्यंत शास्त्रज्ञांची भरती करण्यात येत आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर पासून प्रत्यक्ष लस निर्मिती प्रक्रिया सुरू होईल. रंगीत तालीम झाल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक, किरकोळ दुरुस्त्या तत्काळ दूर करून कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनाची लसनिर्मिती सुरू होण्याची शक्यता आहे.