पुणे : केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या दुरूस्त्यांना विरोध करणाऱ्या भारतीय मजदूर संघाने या दुरूस्त्यांना विरोध म्हणूनच देशातील अन्य कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. आमचा विरोध कायम असला तरी आम्ही या संपात नसल्याचे संघाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र देशपांडे यांनी सांगितले. अन्य कामगार संघटनांचे नियोजित आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याने आम्ही त्यात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}