शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळण्याच्या उद्देशाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदानित तत्त्वावर मिल्किंग मशीन, कडबा कुट्टी मशीन, गोचीड निर्मूलन औषध, मुरघास बॅग, मका व ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे दुधाच्या गुणवत्तेनुसार ३.५ फॅट साठी २५ रुपये प्रतिलिटर बाजारभाव देण्यात येतो. दर दहा दिवसाला दुधाचा पगार शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात करण्यात येत असल्याचे संचालक अजय जाधव यांनी सांगितले.
भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून फक्त सकाळीच संकलन करण्यात येत होते.
या वेळी रामचंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, उत्तम खळदकर, सुभाष जाधव, प्रशांत दुधाळ आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ- परिंचे (ता. पुरंदर) येथे संध्याकाळच्या दूध संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना संस्थेचे संचालक अजय जाधव व मान्यवर उपस्थित होते.