शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न

By admin | Updated: October 28, 2015 01:20 IST

कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

शिरगाव : कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कासारसाई- दारुंब्रे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी श्री संत तुकाराममहाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप शांताराममहाराज मोरे यांच्या आधिपत्याखाली पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी खासदार अशोक मोहळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, श्रीमती रूपलेखा ढोरे, सविता दगडे, कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, माऊली शिंदे, अंकुश आंबेकर, पांडुरंग ठाकर, धैर्यशील ढमाले, चंद्रकांत लोहिरे, स्वाती भेगडे, कुंद विनोदे, मुख्य कार्यकारी संचालक एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते. बापट म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या फायद्यासाठी प्रदीर्घ काळासाठी योजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासारख्या पाणी बचत करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा, शासन ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योग ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी ओळख असून, ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी साखर कारखान्यांची मोठी भूमिका आहे.शिवतरे म्हणाले की, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)