शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेचा फायदा चाळमालकांना

By admin | Updated: May 25, 2014 04:49 IST

र्षानुवर्षे वास्तव्यास असणार्‍या भाडेकरूंना कोणत्याही कटकटीशिवाय घराबाहेर काढणे घरमालकांना महापालिकेच्या घरकुल योजनेमुळे सुकर बनले आहे

पिंपरी : वर्षानुवर्षे वास्तव्यास असणार्‍या भाडेकरूंना कोणत्याही कटकटीशिवाय घराबाहेर काढणे घरमालकांना महापालिकेच्या घरकुल योजनेमुळे सुकर बनले आहे. घरमालक-भाडेकरू वाद संपुष्टात आणण्यास ही योजना उपयुक्त ठरली आहे. अर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी महापालिकेने स्वस्त घरकुल योजना राबवली. १३ हजार २५० घरांच्या या योजनेत पहिल्या टप्प्यात ६७२० पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप होऊ लागले आहे. या योजनेत अर्ज केलेले बहुतांश अर्जदार हे चाळीत भाडेपट्ट्याने राहणारे आहेत. वर्षानुवर्षे चाळीतील छोट्या घरात दिवस काढणार्‍या नागरिकांना महापालिकेच्या घरकुल योजनेत हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला. घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वी लाभार्थी ज्या ठिकाणी भाड्याने राहात होता, त्या मूळ घरमालकाकडून लाभार्थ्याने घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून महापालिकेस सादर करणे बंधनकारक केले आहे. कोणताही वाद न घालता, भाडेकरूचे हक्क प्रस्थापित न करता भाडेकरू घर सोडतात. हे घरमालकाच्या दृष्टीने फायद्याचे ठरू लागले आहे. घरकुल प्रकल्पात घर मिळाल्याने विनाकटकट भाडेकरू घर सोडतात. त्यामुळे अनेक घरमालक भाडेकरूंना त्वरित ना हरकत दाखला देत आहेत. मात्र काहींना ना हरकत देताना भीती वाटू लागली आहे. भाडेकरूसंबंधी दस्तऐवज तयार झाल्यास भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते, या भीतीने काही घरमालक असा दाखला देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. ना हरकत दाखला देण्यास घरमालकांकडून अडवणूक होऊ लागल्याने लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. महापालिकेच्या योजनेत घर मिळाल्याने भाडेकरू गावठाण भागातील चाळीतील भाड्याची खोली सोडण्यास तयार होतात, हेच घरमालकांना अधिक फायद्याचे वाटू लागले आहे. वर्षानुवर्षे राहणार्‍या भाडेकरूला बाहेर काढून खोली रिकामी करणे घरमालकांना अत्यंत अवघड जाते. घराच्या बदल्यात घर अथवा आर्थिक मोबदला दिल्याशिवाय भाडेकरूकडून खोली रिकामी करून घेता येत नाही, हे घरमालकांना माहिती आहे. पण या योजनेमुळे विनाकटकट भाडेकरू बाहेर पडू लागल्याची बाब सर्वचदृष्टीने घरमालकांना फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला दीड लाखात घरकुल अशी महापालिकेची घोषणा होती. बांधकाम खर्च वाढल्याने घरकुलाची किंमत ३ लाख ७६ हजार झाली. महापालिकेने पुढाकार घेऊन लाभार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच लाभार्थ्यांना घराचा ताबा दिला जातो. (प्रतिनिधी)