दौंड शहराला कचऱ्याचा विळखा या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शनिवार ( दि. ५) च्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली. या वृत्ताची दखल घेत शहरातील कचरा शनिवारपासून उचलण्यास सुरुवात झाली. परिणामी, शहरातली दुर्गंधी कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.मात्र या नागरी समस्येकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नसल्यामुळे शहरातील दर्शनीभागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले होते. मात्र या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे.भविष्यात शहरात कचरा साचून राहणार नाही, याची नगरपरिषदेने दखल घ्यावी या मागणीने नागरिकांतून जोर धरला आहे.जुने गावठाण आणि शहराचा विस्तारीतभाग तूर्त तरी कचरामुक्त झाला आहे.तसेच नागरिकांनी देखील कचराकुंडीतच नेऊन टाकावा. मात्र कुंडीच्या परिसरात कचरा आस्तव्यस्त फेकू नये शहरातील काही कुटुंब घरातील कचरा तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरून खाली रस्त्यावर फेकतात तेव्हा अशा कुटुंबांवर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आहे.
दोन दिवसांपूर्वी गोपाळवाडी रोडवरच कचरा साचलेला
‘लोकमत’ने बातमी प्रसिध्द केल्यावर याच जागेवरचे छायाचित्र.