शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्ग कामाच्या मंजुरीच्या श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

चाकण : पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकणमधील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाशी नागरिकांसह वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला ...

चाकण : पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकणमधील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाशी नागरिकांसह वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.कारण लवकरच इंद्रायणी नदीपासून ते राजगुरूनगरपर्यंत दरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरणासह चाकण येथे उड्डाण पूलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.मात्र सेना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कामाच्या श्रेयवादावरून सोशल मीडियावर मोठी स्पर्धा सुरू आहे.

चाकण शहरासह परिसरातील वाढती लोकसंख्या,वेगाने वाढणारी कारखानदारी,अपुरे पडणारे रस्ते,चौकाच्या चारही बाजूंनी असणारे अवैध बस थांबे,तसेच सर्वसामान्याना भंडावून सोडणारे रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण,चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल तसेच उद्योगाची पंढरी समजल्या जाणार्‍या छोट्या मोठ्या कारखान्यामूळे येथील पुणे नाशिक मार्गावरील आळंदी फाटा, स्पाईसर चौक,तळेगाव चौक,आंबेठाण चौक,तसेच तळेगाव - चाकण - शिक्रापूर या महामार्गावरील म्हाळुंगे, खराबवाडी, माणिक चौक या ठिकाणी सतत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे चाकणकरांसह उद्योजकांचा गुदमरलेला श्‍वास लवकरच मोकळा होणार आहे.

चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाण पुलासह रस्ता रुंदीकरण करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.तसा हा प्रश्न लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरल्याने मतदारांनी विद्यमान खासदारांना नाकारत नवीन चेहऱ्याला काम करण्याची संधी दिली.हे काम मार्गी लावण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात सध्या सोशल मीडियावर श्रेयवादाची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.तर भाजपने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंजुरी दिल्याने आमच्यामुळेच या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगत श्रेयवादात उडी घेतली आहे.परंतु यांच्या नुसत्या श्रेयाने लगेच हा प्रश्न सुटलेला नाही.ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने चाकणच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला असे म्हणावे लागेल. तोपर्यंत तरी रोजच्या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

पुणे नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते मोशी टोल नाका या १७.७७ किलोमीटर लांबीच्या ६५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महामार्गावरील भूसंपादनातील वाढत्या अडचणी लक्षात घेता ४५ मीटर महामार्गाची रुंदी असणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार असून, चाकण या ठिकाणी २.२५ किमी लांबीचा मोठा उड्डाणपूल तसेच ७ व्हेईकल अंडरपास व २ ठिकाणी ओव्हरपास करण्यात येणार आहे.