शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीला पसंती

By admin | Updated: November 11, 2015 01:48 IST

तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील ब्रँडेड बासमतीला पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड बासमतीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे

पुणे : तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील ब्रँडेड बासमतीला पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड बासमतीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षात बासमतीची निर्यात २० लाख टनापर्यंत पोहचली आहे.जगात केवळ भारतातील पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्येच सर्वाधिक बासमती तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे जगाला बासमती पुरविणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतातून अमेरिका, आॅस्ट्रेलिया यांसह आखाती देशांमध्ये बासमतीला तांदळाला अधिक मागणी आहे. या देशांमध्ये मागील काही वर्षांत ब्रँडेड बासमती तांदुळाची निर्यात वाढली आहे. साधारणत: १२२० डॉलर प्रति क्विंटल या दराने भारताला साडेचार अब्ज डॉलरचे परकीय चलन मिळाले. मात्र एप्रिलनंतर सप्टेंबरअखेर नियार्तीत पंचवीस टक्के घट येऊन गेल्या वर्षीच्या तुलनेने १.८० अब्ज डॉलरचे परकीय चलन मिळाले. त्यावेळेस नियार्तीचा दर ९५० डॉलर प्रति क्विंटल एवढा होता. अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅन्ड प्रोसेस्ड फुड प्रोडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (अपेडा) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००९-१० मध्ये भारतातून ९ लाख टन ब्रँडेड बासमती तांदळाची निर्यात झाली होती. पुढील प्रत्येक वर्षी यामध्ये वाढ होत गेली. २०१४-१५ मध्ये हा आकडा २० लाख टनांपर्यंत पोहचला. सध्याच्या हंगामात ही निर्यात २३ लाख टनांपर्यंत जाईल, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, इराणने मागील वर्षी सुमारे ७० टक्के बासमीत तांदुळ कमी घेतला. त्यामुळे भारतीय बासमती तांदळाला भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देऊन त्याचा भारतातच विक्रमी खप वाढवावा, असा अपेडाने निर्णय घेतला होता. त्यासाठी भारतातील ब्रँड बासमती ग्राहकांसाठी एक किलो, पाच किलोचे ब्रँड बासमती तांदळाचे उत्कृष्ट पॅकिंगमध्ये उपलब्ध केले आहे. याला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने खप वाढत आहे.