शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये पैशांसाठी ‘आधार’

By admin | Updated: November 2, 2015 00:49 IST

शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सेवा विनामूल्य असतानाही शाळेतून आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांमध्ये उघडकीस आला आहे

सुवर्णा नवले, पिंपरीशासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सेवा विनामूल्य असतानाही शाळेतून आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांमध्ये उघडकीस आला आहे. महापालिके चे आदेश नसताना मनमानी पद्धतीने काही महाभाग आधार केंद्रचालक आधार काढण्यासाठी शाळांमध्ये जाऊन स्वत:च आधार कार्ड काढून देत आहेत.सध्या महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांचेच आधार कार्ड काढण्यासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या केंद्रचालकांना कामाचे आदेश दिले आहेत. शाळांमधील मुख्याध्यापकांना व शिक्षकांना आधार कार्ड विनाशुल्क मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे आकारले जाणे, हा गुन्हा आहे. याबाबत माहिती असतानाही शिक्षक व मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. खासगी शाळांमध्ये आधारसाठी शुल्क घेतले जाण्याचे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. महापालिका शिक्षण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भोसरीतील स्पाइन रोड, क्र ांती चौक येथील एसपीजी इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रकार घडला आहे. शाळेतूनच आधार कार्ड काढून मिळेल, अशा नोटीस पालकांना पाठविण्यात आल्या होत्या. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकही आधारसाठी शुल्क आहे, असे सांगत आहेत, ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. ज्याशाळांमध्ये शुल्क आकारले जात आहे. त्या शाळांची चौकशी होण्याची गरज आहे.तीन शाळांवर एकच आधार केंद्रचालक शाळांमध्ये जाऊन आधार कार्ड काढून देत आहे, तेसुद्धा शुल्क आकारून. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मात्र, आधार केंद्रचालकांना चांगलीच मलई या माध्यमातून मिळत आहे. जे आधार केंद्रचालक प्रामाणिकपणे आधार काढण्याचे काम करीत आहेत. त्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत आहे. दैनंदिन ई-सुविधांची कामे सोडून ही मंडळी आधारसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये विनाशुल्क काम करीत आहेत. याचा फायदा काही चालकांनी शुल्क आकारून घेतला आहे. मात्र, आधार कार्डची होणारी लूट या अनागोंदी कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष नाही. शाळेतून आधारसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत माहिती घेतली जाईल. यापूर्वी ज्या शाळांमधून अशा तक्रारी आल्या आहेत, त्या शाळांमध्ये आधार मशिन बंद केल्या. मात्र, शाळांमध्ये आधारसाठी पैसे घेत असल्यास अशा शाळांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. - आशा उबाळे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी