शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

...तर बारामती टोलमुक्त झाली असती

By admin | Updated: November 3, 2015 03:28 IST

बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा, या तत्त्वावर बारामती शहरातील रस्त्यांची बांधणी करण्यात आली. बारामती नगरपालिकेने तारण म्हणून रस्ते विकास महामंडळाला जळोची

बारामती : बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा, या तत्त्वावर बारामती शहरातील रस्त्यांची बांधणी करण्यात आली. बारामती नगरपालिकेने तारण म्हणून रस्ते विकास महामंडळाला जळोची येथील २२ एकराचा भूखंड कराराने दिला. बारामती संपूर्ण टोलमुक्त करण्यासाठी हा भूखंड रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात द्यावा. त्यावर टाकण्यात येणारा कचरा बंद करावा, असे लेखी पत्र बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना महामंडळाने दिले. त्याकडे काणाडोळा करून भूखंड परत मिळविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बारामतीची संपूर्ण टोलमुक्ती झाली नाही, अशी बाब उघड झाली आहे.सन २००३ मध्ये बारामती शहराच्या भिगवण-बारामती, इंदापूर-बारामती, बारामती-मोरगाव, बारामती-पाटस या राज्य मार्गांवर टोलनाके उभारून एकात्मिक रस्ते विकास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाला सुरुवातीला ३८ कोटी रुपये खर्च होता. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ५ वर्षांवरील ५ टोलनाक्यांवर २००५ ते २०१० या काळात टोलवसुली करण्यात आली. कराराने भूखंड दिल्यापासून तेथील कचरा डेपो बंद करावा, अशी रस्ते विकास महामंडळाची मागणी होती. मात्र, नगरपालिकेने मागील १४ वर्षांत फक्त कचरा डेपोसाठी जागा पाहणीवरच लक्ष दिले. शहराची हद्दवाढ झाली. २० ते २५ किलोमीटर परिसरात जमिनींचे दर वाढले. बारामतीचा कचरा ‘नको रे बाबा’ अशीच भूमिका गाडीखेल, माळेगाव खुर्द, पिंपळीसह अन्य परिसरातील ग्रामस्थांनी घेतली. जळोचीतील भूखंड मोकळा करून देण्यासाठी पर्यायी जागा ढाकाळे येथे पाहण्यात आली. ती खरेदी केली. ताब्यात देण्यासाठी कचरा डेपो मोकळा करून देणे, अशी अट बारामती टोलवेजने घातली. मात्र, ग्रामस्थांच्या विरोधामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न ढाकाळेत होणे आता कठीणच आहे. प्रसंगी ग्रामस्थ उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने अध्यादेशाद्वारे ताब्यात दिलेला भूखंड परत घेण्यासाठी वेगवेगळे ठराव नगरपालिकेच्या माध्यमातून केले जात आहेत. वास्तविक शासन निर्णयावर शासनानेच फेरविचार करणे गरजेचे आहे. तसे न करता फक्त ठराव करून भूखंड परत मागितला जात आहे. (प्रतिनिधी) रस्ते महामंडळाच्या पत्राकडे दुर्लक्षरस्ते विकास महामंडळाला यापूर्वी बारामतीतील टोलनाके पूर्णपणे बंद करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. परंतु, रस्ते विकास महामंडळाबरोबर २००३ मध्ये केलेल्या कराराप्रमाणे शासन निर्णय झाला आहे. करार झाल्यापासून कचरा डेपोची जळोचीतील जागा महामंडळाच्या ताब्यात दिली नाही. कागदोपत्री महामंडळाचे नाव लागले. नगरपालिकेने तेथे कचरा टाकणे बंद केले नाही. भूखंडाची किंमत वाढली आहे. त्यामुळे पथकर रद्द करावेत, असे नगरपालिकेने महामंडळाला कळविले होते. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सप्टेंबर २०१४मध्येच भूखंडावर कचरा टाकणे बंद करा, भूखंडाचा ताबा महामंडळाला द्या, तत्काळ सर्व टोलनाके बंद केले जातील, असे पत्र नगरपालिकेला पाठविले. परंतु, कचरा डेपोची पर्यायी व्यवस्था पालिकेला करता आली नाही. त्यामुळे टोलनाके सुरूच राहिले आहेत.