Baramati Election Results 2026: सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु; ८ व्या फेरीअखेर तब्बल ७० हजार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:04 IST2026-05-04T11:00:08+5:302026-05-04T11:04:29+5:30
Baramati By Election Results 2026: दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होण्याची शक्यता आहे

Baramati Election Results 2026: सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु; ८ व्या फेरीअखेर तब्बल ७० हजार मतदान
बारामती : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५२.४४ टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही.
आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळपासूनच आघडीवर आहेत. ८ व्या फेरी अखेर एकूण सुनेत्रा पवारांना आतापर्यंत ७० हजार ६४२ मते मिळाली आहेत. तर इतरांना १ हजार २८९ मते मिळाली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार आहेत.
विजयाच्या दिशेने वाटचाल
सध्याची अपडेट पाहता सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या पोटनिवडणुकीत दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होणार आहे. हा ‘जादुई आकडा’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गाठणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.