शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे कमलजामातानगरमध्ये शेतामध्ये उसाला औषधफवारणी करत असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे कमलजामातानगरमध्ये शेतामध्ये उसाला औषधफवारणी करत असताना विजेचा शॉक लागून बाप आणि मुलाचा मृत्यू झाला. रविवारी (दि.२५) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

यादव भीमाजी पटाडे (वय ७०) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या बापलेकाची नावे आहेत. हे दोघेजण उसाच्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत होते. त्यांच्या शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षांपासून बंद पडलेल्या विद्युतवाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. पडलेल्या तारांमध्ये विद्युतप्रवाह सुरू नसायचा. परंतु अचानकपणे विद्युतप्रवाह सुरू झाला. यावेळी फवारणी करणाऱ्या यादव पटाडे व श्रीकांत पटाडे यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पटाडे पितापुत्राच्या मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप बोरी खुर्द ग्रामस्थांनी केला आहे. गेली तीन ते चार वर्षांपासून बंद असणारी विद्युतपुरवठा करणारी लाईन बंद होती. तिच्या तारा तशाच खाली पडून होत्या. याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रारी करूनही या तारा महावितरणने हटवल्या नाहीत. वेळीच या तारा महावितरणने काढल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती.

चौकट

अनेक ठिकाणी धोकादायक तारा

महावितरणच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या अनेक तारा या धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी खांब वाकलेले आहेत. तारा धोकादायक लोंबकळलेल्या आहेत. या तारांची व विद्युतखांबांची महावितरणने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्रेही धोकादायक झाले आहेत. त्यांच्या केबल अतिशय खराब, आवरनविरहित आहेत. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी महावितरणने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.