शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात व्यक्तींनी बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र करन्सी चेस्ट मंचर

मंचर : खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात व्यक्तींनी बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र करन्सी चेस्ट मंचर येथे सुमारे ७ हजार ३५० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड या तालुक्यांतील बँकेच्या २३ शाखांमधील जमा झालेली कॅश मंचर येथील करन्सी चेस्टमध्ये जमा होते. तेथून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवी मुंबई शाखेत ती जमा केली जाते. करन्सी चेस्टमध्ये जुलै २०१३ दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या ४ बनावट नोटा व ५०० रुपयांच्या २ बनावट नोटा, आॅगस्ट २०१३च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांची १ नोट व ५०० रुपयांची एक बनावट नोट, माहे जुलै २०१४च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपये दराच्या १२ नोटा, ५० रुपयांची एक नोट व ५०० रुपये दराची १ बनावट नोट, माहे जानेवारी २०१५च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या ४ बनावट नोटा व ५०० रुपयांची एक बनावट नोट, नोव्हेबर २०१५च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या १७ बनावट नोटा व ५०० रुपयांच्या २ बनावट नोटा, अशा एकूण ४६ बनावट नोटा भारतीय रिझर्व्ह बॅक सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई यांच्याकडून तपासून आलेल्या व पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांना प्राप्त झालेल्या बनावट नोटा दाखविल्या. बनावट नोटा अज्ञाताने बँकेच्या शिरूर, जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील एकूण २३ शाखांमधील एका शाखेत भरणा केलेल्या आहेत. या बनावट नोटा नक्की कोणत्या शाखेत जमा केल्या व त्या कोणत्या शाखेकडून मंचर करन्सी चेस्टमध्ये प्राप्त झाल्या, याबाबत सांगता येणार नसल्याचे फिर्यादीमध्ये ब्रजेशकुमार बिनोदसिंह यांनी सांगितले. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत. (वार्ताहर)