शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी संस्थेच्या चेअरमनला दणका

By admin | Updated: May 20, 2014 04:07 IST

नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला शासकीय अनुदान मिळालेले, तरीही पुढील शिक्षणापासून तिला वंचित ठेवून भविष्याचे नुकसान केले

पुणे : नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला शासकीय अनुदान मिळालेले, तरीही पुढील शिक्षणापासून तिला वंचित ठेवून भविष्याचे नुकसान केले. याला नर्सिंग प्रशिक्षण संस्था जबाबदार असल्याचे ग्राहक मंचाने निरीक्षण नोंदवले. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या भविष्याची नुकसानभरपाई म्हणून संस्थेच्या चेअरमनने ५० हजार नुकसानभरपाई, तिच्या फीची उर्वरित रक्कम १६, ८७० रुपये आणि तक्रारीचा खर्च ३ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष अंजली देशमुख व सदस्य एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी उत्तमनगर येथील एका विद्यार्थिनीने गुरूराज स्कूल आॅफ नर्सिंग कॉलेज, एन.डी.ए. रस्ता, उत्तमनगर यांचे चेअरमन संजय संभाप्पा झाडे यांच्याविरूद्ध ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. तक्रारदार विद्यार्थिनी ही गुरुराज स्कूल आॅफ नर्सिंग कॉलेजमध्ये आरजीएनएमच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होती. तिने १९ हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाची ४५ हजार रुपये तिला सांगण्यात आले होते. तिची परिस्थिती रक्कम देण्याइतकी नसल्याचे त्यांनी कॉलेजला सांगितले. कॉलेजने साडेतीन वर्षे स्कॉलरशीप मिळेल, असे सांगितले. यासाठी एनआरएचएम कोर्सचा बाँड लिहून घेतला. यानुसार तक्रारादारास जिल्हा परिषदेकडून दर वर्षी २५ हजार रूपये व दरमहा ५०० स्वखर्चाला मिळणार, असे सांगण्यात आले होते. तक्रारदार ही एनटी कॅटेगरीत असल्याने ४१ हजार ७५० स्कॉलरशीप मंजूर झाली. परंतु ती तक्रारदाराच्या खात्यावर आलीच नाही. संस्थेच्याच चेअरमन झाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली व प्रत्येक विद्यार्थ्याकडे फी मागण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्यांनी समाजकल्याण खात्यामध्ये जाऊन माहिती घेतल्याने प्रत्येक विद्यार्थ्यास २५ हजारांप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या नावे ६ लाख जमा झाले आहेत. तसेच सरकारने एनआरएचएम या नर्सिंग कोर्ससाठी ही योजना सुरू केली होती. इतकी फी जमा असतानाही संस्थेने मानसिक छळ केला, फी भरलेली नाही सांगून द्वितीय वर्षाला बसू दिले नाही. कागदपत्रे व प्रथम वर्षाची गुणपत्रिका दिली नाही. त्यामुळे दुसरे वर्ष वाया गेले. तसेच त्यांना फोन करून नुकसान करण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांनी फीची रक्कम व नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंचाकडे तक्रार केली. याप्रकरणी कॉलेजने फी भरल्याची पावती बनावट असल्याचा बचाव केला होता. मंचाने दोन्ही पक्षांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले. त्यानुसार, तक्रारदारांनी भरलेले १९ हजार, एनआरएचएममधून मिळालेली २५ हजार व स्कॉलरशिप ४१ हजार ७५० अशी एकूण ८५ हजार ७५० रुपये जमा होते. कॉलेजची ६८ हजार ८८० रुपये फी असल्याचे गृहित धरले, तरी १६, ८७० रुपये बाकी होते. तरीही दुसर्‍या वर्षाचा प्रवेश नाकारला़ ही कॉलेजच्या सेवेतील त्रुटी आहे. तिच्या भविष्याचे नुकसान केल्याने भरपाईचा मंचाने आदेश दिला. (प्रतिनिधी)