शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम

By admin | Updated: September 11, 2014 04:19 IST

नवरात्र उत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली

पुणे : नवरात्र उत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली. मिरवणुकीमध्ये डीजेच्या भिंती रचून आवाजाचा होणारा दणदणाट रोखण्यासाठी यापुढील काळात पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.गणेश विसर्जन मिरवणुकीचा ३३ तासांचा बंदोबस्त निर्विघ्नपणे पार पडला. यापार्श्वभुमीवर माथूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साताऱ्यामध्ये डीजेंच्या आवाजाने भिंत कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे डीजेंच्या आवाजावर निर्बंध घालण्यावर पोलिसांकडून गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. डीजेंच्या या दणदणाटाला यापुढील काळात परवानगी दिली जाणार नसल्याचे माथूर यांनी स्पष्ट केले.मागील दोन वर्षांमध्ये नवरात्रामध्ये तोरण मिरवणुका काढण्याचे फॅड मोठ्याप्रमाणात वाढले, त्यातून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, मारामाऱ्या होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मागील वर्षी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी कोणत्याही नवरात्र मंडळास तोरण मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिली नव्हती. या वर्षीही तोरण मिरवणुकींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे माथूर यांनी सांगितले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत सूचना देण्यात येणारआहेत. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये टोल वाजविण्यास बंदी घालण्यात आली होती, त्याचे विशेष लक्ष देण्यात आले. काही मंडळांनी टोलबंदीवर शक्कल लढवून टोलचा आवाज रेकॉर्ड करून आणला होता. पोलिसांच्या ते लक्षात येताच त्यांनी ते संबंधित रेकॉर्डिंग साधने जप्त केल्याचे माथूर यांनी सांगितले. टोलबंदीच्या यशस्वीतेनंतर आता डीजे दणदणाट रोखण्यावर पोलिसांकडून भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)