शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतुकीवर बंदी!

By admin | Updated: October 11, 2016 01:57 IST

बिनबोभाटपणे खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी आता गावानेच पुढाकार घेतला आहे. पाटसच्या ग्रामपंचायत

पाटस : बिनबोभाटपणे खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी आता गावानेच पुढाकार घेतला आहे. पाटसच्या ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या गाड्यांवर बंदी आणण्याचा ठराव ग्रामसभेने केला आहे. या गाड्यातील वाळू जप्त करून, ती लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला राहील, असे गावाने ठरविले.या ग्रामसभेला सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच मंगेश दोशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ट्रक आणि वाळू असा ४0 टनांचा बोजा असतो. गावांतर्गत रस्ते करण्यात आलेले असून, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते खराब व्हायला लागले आहेत. त्यामुळे काही ग्रामस्थांनी खराब रस्त्यांच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करून, भविष्यात गावातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या गाड्या न येऊ देण्याचा पवित्रा घेतला आहे. यावर ग्रामपंचायतीने सकारात्मक चर्चा करून, याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे; तसेच गावातील काही भागात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी अशुद्ध येत आहे. तेव्हा १५ आॅगस्टला झालेल्या सभेत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन ग्रामसभेत पाणीपुरवठा समितीने दिले होते; मात्र अद्याप काही भागात अशुद्ध पाणी येत आहे. तेव्हा सदरची योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी, असाही सूर ग्रामसभेत होता.‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत हगणदरीमुक्त गाव निर्मल करणे, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण अंतर्गत स्वत:चे घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या कुटुंबीयांची यादी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम, सावित्रीबाई फुले कन्या योजनेचा आढावा घेणे यांसह विविध विषयांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. ऐनवेळेच्या विषयात एसटी स्टॅण्डच्या जागेसाठी परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करून, एसटी स्टॅण्ड उभारणे, स्वच्छता अभियान राबविणे, हे ठराव मंजूर करण्यात आले.