शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी

By admin | Updated: February 23, 2017 03:32 IST

महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी

पुणे : महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांना तसेच अन्य उमेदवारांनाही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून निकालानंतरच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी संवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निकालानंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादावादी आणि भांडणे होण्याची शक्यता असते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरूनच विशेष बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विजयी मिरवणुका तसेच वाद्य असलेल्या मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर फटाके वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शहरातील कसबा, नाना पेठ, भवानी पेठ, कात्रज, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, हडपसर, रामटेकडी, सय्यदनगर, बाणेर, बालेवाडी, लोहियानगर, कासेवाडी, चतु:शृंगी, मिठानगर कोंढवा, दत्तवाडी, पर्वतीदर्शन, धनकवडी आदी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची विशेष गस्त राहणार आहे. निवडणूक काळामध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र असे एकूण ११९ गुन्हे दाखल झालेले आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ३गंभीर गुन्हे आणि १२ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांसोबतच वाहतूक, गुन्हे शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या मदतीला बॉम्बशोधक व नाशकची ६ पथके, आरसीपीची चार पथके देण्यात आली आहेत.