शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले बनविण्यात बालगोपाल दंग

By admin | Updated: November 11, 2015 01:21 IST

श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे

लोणावळा : श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे बालचमू दिवसभर किल्ले बनविण्यात दंग असल्याचे दिसत होते. स्पर्धेतील सहभागी युवकांचा उत्साहही वाखण्याजोगा होता.दिवाळी सणानिमित्त घरोघरी किल्ले तयार केले जातात. मात्र, मागील काही काळापासून मुलांचा किल्ले बनविण्याचा उत्साह कमी होऊ लागला होता. मुलांचा हा उत्साह कायम राहावा व त्यांना गड-किल्ले व इतिहासाची सतत जाणीव राहावी, त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, याकरिता मागील सहा वर्षांपासून योद्धा प्रतिष्ठान किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करत आहे. या वर्षी स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच ६० संघांनी नावनोंदणी करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. आजही काही नवीन संघ यामध्ये नव्याने दाखल झाले. सकाळी ८ वाजल्यापासून बालगोपाल किल्ले बनविण्यात दंग होते. तहान-भूक हरपून ते किल्ले बनविण्यात तल्लीन झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धकांना किल्ले बनविण्यासाठी माती, दगड, पाणी आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. किल्ला पूर्ण करणाऱ्या प्रत्येक संघाला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या वर्षी प्रथमच स्पर्धकांसाठी प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दर दिवशी स्पर्धकांना इतिहासावर आधारित ५० प्रश्न विचारण्यात येत आहेत. बरोबर उत्तर देणाऱ्यांना मंडळाच्या वतीने बक्षिसे दिली जात आहेत. तीन दिवसांत हे किल्ले पूर्ण करायचे असून, दि. १४पासून या किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष रूपेश नांदवटे यांनी सांगितले. (वार्ताहर)