शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

‘बाजी’गरांचा तरुणाईशी संवाद

By admin | Updated: February 5, 2015 00:40 IST

आकुर्डी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात बाजी या मराठी चित्रपटातील कलावंतांनी तरुणाईशी संवाद साधला.

आकुर्डी : डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ अ‍ॅप्लाईड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट महाविद्यालयात उपक्रमपिंपरी : आकुर्डी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात बाजी या मराठी चित्रपटातील कलावंतांनी तरुणाईशी संवाद साधला. कलाकारांशी संवाद, अनुभव, महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी केलेले कलाकारांचे स्वागत, विद्यार्थ्यांनी दिलेली चित्रमय भेट याने कलाकार भारावले.आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात बाजीची टीम सोमवारी दाखल झाली. ‘लोकमत’ युवा नेक्स्टतर्फे कलाकार भेटीचा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या वेळी संचालक कर्नल एस. के. जोशी यांनी ‘बाजी’ चित्रपटाचे कलाकार श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचे स्वागत केले. या वेळी जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत तरुणांची मने जिंकली. अमृता खानविलकर यांनी प्रसिद्ध लावणीची झलक दाखवून उपस्थितांची दाद घेतली. श्रेयस तळपदे यांनी भारदस्त आवाजात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. बाजी चित्रपट निर्माण करण्यामागील भूमिका विशद केली. विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत बाजी चित्रपटाचे प्रमोशन झाले. या वेळी प्रा. पल्लवी पांढरे उपस्थित होत्या. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ अ‍ॅप्लाईड आर्ट आणि क्राफ्टच्या प्रभारी प्राचार्या सुमेधा सहस्रबुद्धे यांनी व त्यांच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ‘बाजी’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर कलावंत आपली कला सादर करीत होते, त्या वेळी प्रा. दयानंद हर्षे यांनी कलाकारांचे स्केच तयार केली व त्यांना भेट दिली. महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी अक्षदा शिंदेम्हणाल्या, ‘‘कलावंतांशी गप्पा मारण्याच्या उद्देशाने ‘बाजी’ चित्रपटातील कलावंतांची भेट हा कार्यक्रम झाला. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. ’’(प्रतिनिधी)