शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार असलेल्या अन‌् दुचाकी चोरणाऱ्या सराईताचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

पुणे : सात गुन्हे दाखल असलेल्या आणि तडीपाराचा आदेश डावलून शहरात येऊन दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताचा जामीन अर्ज ...

पुणे : सात गुन्हे दाखल असलेल्या आणि तडीपाराचा आदेश डावलून शहरात येऊन दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अजय चंद्रकांत विटकर (वय १९, रा. वडारवाडी) असे त्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. परदेशी यांनी हा आदेश दिला.

दि. ९ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अजय हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असताना बाणेर परिसरात पोलिसांना आढळून आला. या वेळी त्याला शहरात येण्यासाठी न्यायालय अथवा पोलीस उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली असता, त्याने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तसेच, त्याकडील दुचाकीसंदर्भात चौकशी केली असता त्याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यानंतर ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दुचाकी जप्त करत अटक करण्यात आली. याबाबत बचाव पक्षाच्यावतीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. अजय हा सराईत गुन्हेगार आहे. तडीपारीचा आदेश डावलून तो शहरात दुचाकी चोरी करीत होता. त्याविरोधात या स्वरूपाचे आणखी सात गुन्हे दाखल आहेत. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो या स्वरूपाचे गुन्हे पुन्हा करण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणातील साक्षीदारांना धमकाविण्यासह तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. मुरळीकर यांनी केला. तो न्यायालयाने मंजूर करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

--------------------------------------------------------------------------