शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी चुकविणाऱ्या श्रीमंतांवर बडगा..!

By admin | Updated: January 13, 2017 02:26 IST

पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे.

बारामती : पाणीपट्टी चुकविणाऱ्या धनधांडग्यांना जरब बसविण्यासाठी जलसंपदा खाते सरसावले आहे. ५ ते १० वर्षांपासून या धनदांडग्या बागायतदारांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता या बड्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा बोजा चढविण्यात येणार आहे.बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतीला नीरा डावा कालव्यातील पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी जलसंपदा खात्याच्या वतीने प्रतिएकरनुसार पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. नोटाबंदीनंतर सर्व शासकीय खात्यांच्या थकीत रकमेसाठी जुन्या नोटा भरणा करण्याची मुभा शासनाने दिली होती. त्यामुळे जुन्या नोटांचा भरणा करून थकबाकी भरण्यासाठी पाटबंधारे खाते वगळता सर्व शासकीय खात्यांना वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला. महावितरण, नगरपालिका, आरटीओ आदी कार्यालयांमध्ये लाखोंचा भरणादेखील झाला. मात्र, पाटबंधारे खात्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे अल्प प्रमाणात खात्याला पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद मिळाला. बारामती आणि पणदरे पाटबंधारे उपविभागाकडे नोव्हेंबर २०१६ अखेर एकूण ९ कोटी ४ लाख ५७ हजार रुपये थकबाकी होती. त्यापैकी नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या भरण्याद्वारे दोन्ही उपविभागांत४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली झाली.जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर हा बोजा चढविला जाणार नाही. मात्र, ५ ते १० वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या धनदांडग्यांचे प्रमाण अधिक आहे. ५ हजारांपासून अगदी १ लाखापर्यंत ही थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर संबंधित रकमेचा बोजा चढविला जाणार आहे. संबंधित रक्कम आणि नावे तहसील कार्यालयाला कळविण्यात आली आहेत. पाटबंधारे खाते सरसावले, कळवूनही वसुली झाली नाही१ ते २ वर्षांची चालू थकबाकी असलेले शेतकरी थकबाकी भरतात. काही आर्थिक अडचणींमुळे थकबाकी भरण्यासाठी या शेतकऱ्यांकडून विलंब होतो. मात्र, पाणीपट्टी भरली जाते. मात्र, गेल्या ५ ते १० वर्षांपासून थकीत असणारी पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाटबंधारे खाते सरसावले आहे. साखर कारखान्यांना कळवूनदेखील मोठे थकबाकीदारांकडून वसुली झाली नाही. मागेल तेवढे पाणी घ्यायचे. वर्षानुवर्षे पाणीपट्टी न भरण्याची यांची मानसिकता आहे. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्याशिवाय पर्याय नाही. या धनदांडग्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आता बोजा चढविण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाने सुरू केली आहे.