शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो पिकावर विषाणूंचा हल्ला

By admin | Updated: June 15, 2016 04:47 IST

वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला

मंचर : वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, महागड्या औषधांची फवारणी करून कोणताही फायदा होत नाही़ शेतकऱ्यांच्या अंगावर भांडवल आले आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोने मागील दोन वर्षे शेतकऱ्यांना मालामाल केले़ यावर्षी मात्र टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सुरुवातीस बियाण्यात फसवणूक होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या टोमॅटोबागा अक्षरश: उपटून टाकाव्या लागल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरे टोमॅटो पीक घेतले, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.़ टोमॅटोची लागवड झाली की लगेच रोपांची मर सुरू होते़ तसेच निम्मे पीक वाया जाते़पिकाची वाढ होताना व्हायरस अ‍ॅटॅक वाढला आहे़ पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ विषाणूजन्य रोगामुळे टोमॅटोची पाने बारीक होतात़ वाढ खुंटते त्यामुळे टोमॅटो फळ बारीक निघते. अद्याप पाऊस पडला नाही. वातावरणात उष्णता आहे़ यामुळे किडीला व रोगाला पोषक असे वातावरण निर्माण होत आहे़ तालुक्यात सध्या ७ हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतले जात असल्याचा अंदाज आहे़ बहुतेक ठिकाणाच्या टोमॅटो पिकावर याचा परिणाम जाणवत आहे. शेतकरी पीक वाचविण्याचा व जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ मात्र, त्याला यश येताना दिसत नाही़ (वार्ताहर)- टोमॅटोला एकरी ४० ते ५० हजार रूपये खर्च येतो़ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात अजून वाढ झाली आहे़ विशेषत: विषाणूजन्य व्हायरसला अटकाव करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे़ औषध फवारणी करूनसुद्धा कुठलाही परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झालेले दिसतात़ टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे़ पाऊ स पडला तर मात्र परिस्थिती बदलू शकते़ टोमॅटोवरील व्हायरस अटॅक बऱ्यापैकी नियंत्रणात येईल, असे महेश मोरे यांनी सांगितले़