रांजणगाव गणपती स्व. बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे कार्य जिल्ह्यातील एक आदर्श शेतीविषयक व वैज्ञानिक केंद्र व्हावे असे प्रांत सदस्य विनायक थोरात यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यवाह अविनाश भेगडे, प्रतीक परळीकर विभाग संघचालक संभाजी गवारे, अॅड. मदन फराटे, रवी पिंगळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड, सुधाकर पोटे, सूर्यकांत शिर्के, धर्मेंद्र खांडरे, सहसचिव प्रभाकर मुसळे, पोपट दरेकर, कांतीलाल नलगे आदी मान्यवर उपस्थित होते
किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर टेमगिरे यांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक शेती, गोपालन, विषमुक्त शेती आदी विषयांची गरज व प्रात्यक्षिकातून घेतलेले अनुभव विशद केले. तर तानाजी राऊत यांनी भूमी सुपोषणाची माहिती दिली. तसेच आगामी काळात शेतकऱ्यांच्या सहली, शेतीमालाला बाजारभाव, माती परीक्षण, पाणी परीक्षण व पर्यावरण आदी विषय व प्रकल्पाबाबत संकल्प तयार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सागर फराटे, अशोक गाजरे, नारायण शिंदे, जयेश भुजबळ, व विठ्ठल वाघ यांनी केले होते. या कार्यक्रमास मांडवगण फराटा, निमोणे, शिरसगाव, दहिवडी, तळेगाव ढमढेरे, दरेकरवाडी, राऊतवाडी, बुरुंगवाडी, धामारी, मलठण, वाघाळे, विठ्ठलवाडी आदी गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत धर्मेंद्र खांडरे, सूत्रसंचालन प्रभाकर मुसळे, आभार प्रा. सूर्यकांत शिर्के यांनी मानले.