शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

‘‘बा अन् आय दोघं कचरा वेचतात’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:29 IST

सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय

पुणे : सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय आणि अश्विनीच्या आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जिवापाड कष्ट केले. कचरा गोळा करून यादोन्ही पालकांनी मोठ्या हिमतीने आपल्या मुलांना शिकवत उज्ज्वल भविष्याची आस त्यांच्या मनात तेवत ठेवली आहे.नुकत्याच बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात विजयने ८९ टक्के तर अश्विनीने ५५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोघांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल्या मुलांच्या निकालाची बातमी कळली, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.विजयचे वडील पवनानगर (धनकवडी ) येथे राहतात. त्यांच्याकडे एक स्वत:ची गाडी असून, तिचा उपयोग ते कचरा भरण्यासाठी करतात. सकाळी उठायचं, मिनिडोअर गाडी काढायची, आणि परिसरातील घरांमध्ये जायचे. तिथला कचरा घ्यायचा. तो गाडीत टाकायचा. हे दिवसभरातले काम. महिन्याला एका घराला ५0 रुपये मिळतात. अशी २५0 घरे आहेत. विजयने सुरुवातीपासूनच स्वअध्ययनावर भर दिला. त्याच्या अंगी मुळातच हुशारी होती. त्यामुळे त्याला वेगळ्या शिकवणुकीची गरज पडली नाही. महाविद्यालयात जे काही शिकवले जायचे, त्यावरच लक्ष केंद्रित करून त्याने अभ्यास केला. आपले आईवडील काय करतात याची जाणीव त्याला असल्याने जसे शक्य होईल त्यानुसार अभ्यास करण्यावर विजयने भर दिला. विशेष म्हणजे अकरावीच्या वर्गातदेखील विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजयचे वडील सांगतात, ‘‘मला पण मोठा सरकारी अधिकारी व्हायचे होते. परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. घरची गरिबी, अभ्यासाला पुस्तके नाही. तशा अवस्थेतदेखील दहावीपर्यंत मजल मारली. आता विजयला पुढे शिकवायचे आहे. त्याची जिद्द मोठी आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.’’ विजयने या वेळी सुटीच्याकाळात पुढील शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नारळपाण्याचा स्टॉल सुरू केला. २ महिने त्याने ते काम करून पैसे जोडले. साक्षी नाडेहिचे आईवडील देखील कचरावेचक असून तिनेदेखील अथकप्रयत्नाने बारावीला ८१ टक्के गुण प्राप्त केले आहे.आई आणि वडील या दोघांना जेवढं शक्य होतं त्या बळावर ते आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टांना उत्तरायी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी करावी लागेल. वडिलांचे स्वप्न सरकारी अधिकारी व्हायचे होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. बारावीपर्यंत कुठल्या क्लासेसची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर भर होता. पुढे तर मदतीची अपेक्षा आहेच. तसे झाल्यास स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणखी वाढेल.- विजय कदमअश्विनीचे आईवडीलदेखील कचरावेचक आहेत. ती वारजे माळवाडी येथील रामनगर येथे राहते. वडील विलास निर्मळ यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले. वास्तविक वह्या, पुस्तके यांसारख्या इतर विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कराव्या लागणाºया जीवघेण्या संघर्षाची कल्पना अश्विनीला आहे. पुढील शिक्षणाला काही मदत झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर पदवीधर होऊन आईवडिलांना हातभार लावेल.- भावना अश्विनी

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८