शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

सजग पुणेकरही लोकसहभागात उदासीन

By admin | Updated: August 20, 2016 05:30 IST

महापालिकेच्या वतीने दरवर्षी नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाकरिता ५० लाखांचा निधी राखून ठेवला जातो. मात्र गेल्या ७ वर्षांपासून निम्म्यापेक्षाही जास्त निधी शिल्लक

- दीपक जाधव, पुणे

महापालिकेच्या वतीने दरवर्षी नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाकरिता ५० लाखांचा निधी राखून ठेवला जातो. मात्र गेल्या ७ वर्षांपासून निम्म्यापेक्षाही जास्त निधी शिल्लक राहून लॅप्स होत आहे. सजग, चौकस व जागरूक नागरिक अशी ओळख असलेल्या पुणेकरांकडून त्यांच्या हक्काचा निधी शिल्लक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेला प्रत्येक बाबतीत धारेवर धरणाऱ्या स्वयंसेवी संस्थाही याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेच्या वतीने दरवर्षी आॅगस्ट महिन्यामध्ये जाहिरात प्रकाशित करून नागरिकांना त्यांच्या प्रभागात करावयाची कामे सुचविण्याचे आवाहन केले जाते. या कामांसाठी प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख याप्रमाणे एकूण ३७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. पुढील २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी कामे सुचविण्याचे निवेदन पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. येत्या ९ सप्टेंबर २०१७ पर्यंत नागरिकांना यासाठी लेखी सूचना पालिकेकडे करता येणार आहेत. मात्र, नागरिकांच्या उदासीनतेमुळे गेल्या ७ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येत आहे.आपल्या प्रभागातील नेमके प्रश्न काय आहेत. त्यासाठी कोणत्या सेवा, सुविधा आवश्यक आहेत याची चांगली जाण स्थानिक नागरिकांना असते. त्यामुळे त्यांनी महापालिकेला त्यानुसार कामे सुचवातीत. त्यांचाही सहभाग अंदाजपत्रक तयार करताना राहावा यासाठी सहभागी अंदाजपत्रकाची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षांखाली बैठक घेतली जाते. नागरिकांच्या सूचनांनुसार कामांचा प्रारूप आराखडा तयार केला जातो. प्रभाग समितीने मान्यता दिलेल्या कामांचा आयुक्तांकडून मुख्य अंदाजपत्रकामध्ये समावेश केला जातो. प्रामुख्याने पदपथ, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांना प्राधान्य दिले जाते. नगरसेवकांकडून कामे होत नाहीत अशी तक्रार अनेकदा नागरिकांकडून केली जाते. मात्र, त्यांच्या हक्काचा निधी मात्र खर्च केला जात नाही. महापालिकेतील चुकीच्या बाबींवर स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून अनेकदा टीका केली जाते. मात्र नागरिकांनी अंदाजपत्रकामध्ये सहभाग नोंदवावा यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्याचबरोबर महापालिकेकडूनही दरवर्षी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रकाशित करून केवळ सहभागी अंदाजपत्रकाचा उपचार उरकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी सहभागी अंदाजपत्रकाबाबत विशेष लक्ष देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते; मात्र त्यावर कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.नागरिकांना करता येणार ९ सप्टेंबर २०१६ पर्यंत सूचना- पुढील वर्षाच्या २०१७-१८ या वर्षातील सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नागरिकांना ९ सप्टेंबर २०१६ पर्यंत आपल्या प्रभागात कोणती कामे करावीत, याच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - प्रभाग समितीची बैठक होऊन या कामांना मान्यता दिली जाईल. त्यानंतर आयुक्तांकडून या कामांचा अंदाजपत्रकात समावेश होईल. नागरिकांनी कामे सुचविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.वर्षसुचविलेली कामेप्रत्यक्षात खर्च२००७-०८१७.६२ कोटी११.३२ कोटी२००८-०९२७.२७ कोटी२०.७५ कोटी२००९-१०३५ कोटी२१.६२ कोटी२०१०-११३०.१६ कोटी१६.५५ कोटी२०११-१२३४.७३ कोटी२३.२८ कोटी२०१२-१३२६.२४ कोटी१६.६७ कोटी२०१३-१४२९.५२ कोटी१८.९२ कोटी- जाहिरात प्रकाशित करून नागरिकांना प्रभागात करावयाची कामे सुचविण्याचे आवाहन केले जाते.