शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संचलन तूट देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: June 1, 2016 00:59 IST

पीएमपीला २०१५-१६ ची ९० कोटी रुपयांची संचलनतूट ११ समान हप्त्यांत देण्यासाठी स्थायी समितीने महिनाभरापूर्वी मान्यता दिलेली आहे. मात्र, त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पीएमपीला निधी देण्यास टाळाटाळ केली

पुणे : पीएमपीला २०१५-१६ ची ९० कोटी रुपयांची संचलनतूट ११ समान हप्त्यांत देण्यासाठी स्थायी समितीने महिनाभरापूर्वी मान्यता दिलेली आहे. मात्र, त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पीएमपीला निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रस्तावानुसार, प्रतिमहिना साडेसात कोटी रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले असून, पालिकेकडून एप्रिल आणि मे महिन्याचा निधी थकविण्यात आला आहे. एकीकडी उन्हाळी सुट्ट्यांमुळे पीएमपीचे मासिक उत्पन्न घटले असतानाच दुसरीकडे पालिकेकडून देण्यात येणारे अनुदानही थकत असल्याने भाडेतत्त्वावरील बसचे भाडे आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उभा करताना पीएमपीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, दोन्ही महापालिकांनी पीएमपीला संचलनतूट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, पुणे महापालिका ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के निधी पीएमपीला दरवर्षी देते. हा निधी एकदाच दिल्यास ही रक्कम मोठी असल्याने पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मागणीनुसार, मागील वर्षापासून दोन्ही महापालिका ही रक्कम ११ समान हप्त्यांत पीएमपीला देतात. त्यानुसार २०१५-१६ ची संचलन तूट अद्याप निश्चित झालेली नसली तरी, पुणे महापालिकेने दरमहा ७.५० कोटी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरमहा ६ कोटी रुपये निधी देण्यास मंजुरी दिली आहे. दोन महिन्यांसाठीचा १२ कोटींचा निधी पिंपरी महापालिकेने जमा केला असून, पुणे महापलिकेकडून निधी देण्यास चालढकल सुरू असल्याचे चित्र आहे.>स्थायीच्या आदेशाला केराची टोपली पीएमपीला अनुदानाची रक्कम देण्यासाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने ३ मे रोजीच मान्यता दिली आहे. ही मान्यता असतानाही महापालिका प्रशासनाकडून निधी देण्यासाठी स्थायी समितीबरोबरच मुख्य सभेची मान्यता असल्याशिवाय निधी देता येणार नाही, असे कारण पीएमपीला दिले जात आहे. त्यातच आता महापालिकेची मुख्य सभा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असून, ही सभा न झाल्यास निधी आणखी लांबणीवर पडणार आहे. विशेष म्हणजे शहरातील कोट्यवधीच्या कामांना स्थायीची मान्यता मिळताच निधी देण्याची घाई असलेले प्रशासन पीएमपीला निधी देण्यासाठी मात्र मुख्य सभेच्या मान्यतेची गरज दाखवून अडवणूक करत आहे.सुट्ट्यांमुळे उत्पन्नात घट पीएमपीच्या उत्पन्नात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठी घट झालेली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच नोकरदारवर्गास सुट्ट्या असल्याने ही घट झालेली आहे. त्यातच पालिकेचे अनुदान नसल्याने आता पीएमपीपुढे वेतन, इंधन तसेच ठेकेदारांना द्यायची बिले आहे. मागील वर्षातील थकीत बिले देण्यासाठी निधीची चणचण भासत आहे.