शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वारज्यात उभी राहणार अधिकृत भाजी मंडई

By admin | Updated: December 12, 2014 00:15 IST

कव्रेनगर व वारजे परिसरात तब्बल 11 भाजी मंडई व ओटय़ांचे आरक्षण असूनही एकही मंडई विकसित झाली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले.

वारजे : कव्रेनगर व वारजे परिसरात तब्बल 11 भाजी मंडई व ओटय़ांचे आरक्षण असूनही एकही मंडई विकसित झाली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले. त्याची गंभीर दखल घेत स्थानिक नगरसेवकांनी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वारज्यातील पहिली अधिकृत मंडई (ओटा मार्केट) प्रभाग क्रमांक 31 येथील  गणपती माथा परीसरातील एनडीए रस्त्याच्या बाजुला उभारण्यात येणार आहे. 
‘आरक्षण असूनही मंडई कागदावरच’ असे वृत्त लोकमतमध्ये गुरुवारी प्रसिध्द झाले. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी त्याची गंभीर दखल घेत अधिका-यांना आरक्षित जागा ताब्यात घेण्याची सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार गणपती माथा परिसरातील ओटा मार्केटसाठी आरक्षित जागा ताब्यात देण्याची तयारी बांधकाम व्यावयिकांने दाखविली आहे. त्यानुसार ही जागा ताब्यात घेण्यासाठी अधिका-यांकडे पाठपुरावा करून मंडई उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले. 
आरक्षित जागा वारजे येतील जुन्या मंडईपासून अवघ्या 3क्क् मीटरवर आहे.   मुख्य एनडीए रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्य़ा जागेवर महापालिकेचे आरक्षण आहे. आरक्षणाचे ठिकाण हे मध्यवर्ती असल्याने वारजेसह शिवणो व त्यापुढेही जाणा-या ग्राहकांची वर्दळ असते. (वार्ताहर)
 
4वारजे येथील प्रभाग क्रमांक 3क् व 31 येथील विविध आरक्षणाच्या जागा ताब्यात घेवून त्याठिकाणी सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी स्थानिक नगरसेवक   नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, भाग्यश्री दांगट व लक्ष्मी दुधाने असा एकत्रित प्रयत्न करणार आहेत. एकदा जागा ताब्यात आल्या की मंडई बांधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे संबंधित नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.