शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औंधचा वाहतूक प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: February 15, 2017 02:40 IST

पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळखला जाणारा औंध परिसर नियोजनबद्धतेच्या अभावामुळे वाहतूककोंडीच्या जाळ्यात

पुणे : पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळखला जाणारा औंध परिसर नियोजनबद्धतेच्या अभावामुळे वाहतूककोंडीच्या जाळ्यात अडकला आहे. महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर या भागातील वाहतूक प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.औंध येथील भाजपा-आरपीआय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते़ यावेळी सुनीता वाडेकर, विजय शेवाळे, अर्चना मुसळे एम. डी. पाटील, दिवाकर शेट्टी, सुरेश सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाला आमदार विजय काळे, परशुराम वाडेकर, मधुकर मुसळे, रोहन कुंभार, अमोल कांबळे, सौरभ कुंडलिक, तुकाराम गाडे, विजय शेवाळे, अनिल राक्षे, भीमराव गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, की वाहतुकीच्या समस्येमुळे शहराजवळ असूनही औंधवासीयांना पुणे स्टेशनला जाण्यासाठी तासभर वेळ लागतो; पण आता मेट्रो, रिंगरोड, बीआरटीएस, एकात्मिक वाहतूक यांच्या माध्यमातून संपूर्ण वाहतूक सेवेचे बळकटीकरण करण्यावर आम्ही भर देणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. मात्र, पुणे महापालिकेत या योजना अमलात आणताना राजकारण झाले. या योजनांबाबत आमचे कौतुक करण्यापेक्षा टीका करण्यातच विरोधकांनी धन्यता मानलीते पुढे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात स्थायिक झाले; पण त्यांना रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका कमी पडली. यामुळे पुण्याचा विकास खुंटला. महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असताना औंध येथे पाण्याची टाकी बांधायला म्हणून पोलिसांची जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी पाठपुरावा केला होता. पण, आजतागायत महापालिकेने ही जागा उपलब्ध करून दिली नाही. गेल्या २५ वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असूनही अनेक मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत.