शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

खुन्नस देतोस का म्हणून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मी इथला भाई आहे, तरी मला खुन्नस देतोस, सुरज ठोंबरेला का भेटतोस, असे म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मी इथला भाई आहे, तरी मला खुन्नस देतोस, सुरज ठोंबरेला का भेटतोस, असे म्हणून एका टोळक्याने कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. या तरुणाला वाचविण्यासाठी आलेल्या दोघा मित्रांवरही वार करुन जखमी केले.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी चेतन संजय चव्हाण (वय २१, रा. मंगळवार पेठ), संकेत अनंत तारू (वय २१, रा. कसबा पेठ) या दोघांना अटक केली आहे. या घटनेत रहीम कुरेशी (वय २१,रा. सदानंदनगर) हा जखमी झाला आहे. ही घटना सोमवार पेठेतील सदानंदनगर येथे सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम कुरेशी व त्याचे मित्र रफिक, अल्ताफ, उमर, बुरहान शेख यांच्यासोबत येथील एका बाकड्यावर गप्पा मारत बसला होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून हातात कोयते फिरत तेथे आले. आम्ही इथले भाई असताना देखील हा नेहमी खुन्नस देतो, हा सुरज ठोंबरेला भेटत असतो, असे म्हणत कोयत्याने फिर्यादीवर वार करण्यात आले. त्यामध्ये हाताला व पोटाला दुखापत झाली. दरम्यान हा सर्व प्रकार सुरु असताना, फिर्यादीला वाचवण्यासाठी अल्ताफ व रफिक आले असता, त्यांना देखील कोयत्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर टोळक्याने हातात कोयते फिरवत आम्ही येथील भाई आहोत, आम्हाला कोणी खुन्नस द्यायची नाही असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे अधिक तपास करीत आहेत.