शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल ३७ हजारांना विकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात तब्बल ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात तब्बल ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली.

निकिता गोपाळ ताले (वय २५, रा. एमआयडीसी, भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय २७), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २०, दोघे रा. अमित अपार्टमेंट, चाफेकर चौक, चिंचवड), प्रतीक गजानन भोर (वय २६, रा. अनुसया पार्क, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना खडकी बसस्टॉपकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण रेमडेसिविर इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, यांनी सहायक निरीक्षक प्रकाश् मोरे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. बनावट ग्राहक तयार करुन गुरुद्वारा परिसरात निकिता ताले हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून १ इंजेक्शन जप्त केले. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांच्या मदत घेण्यात आली.

तिच्याकडे केलेल्या चौकशी या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. वाळुंज हे दोघे भाऊ असून रोहन हा शिक्षण घेत आहे.

निकिता ताले व प्रतीक भोर यांचा कार्ड प्रिटिंगचा व्यवसाय आहे. निकिताला राहुल याने हे इंजेक्शन आणून दिले होते.

शहर पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांना अटक केली आहे.

....

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची माहिती कळवा

रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणार्‍या विरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथके कार्यान्वित केलेली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी त्वरित शहर पोलिसांशी संपर्क साधावा.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर