शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

झाडांच्या मुळांवरच हल्ला

By admin | Updated: May 19, 2014 00:31 IST

वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पर्यावरणाचा -हास होत असून झाडांची संख्या कमी होण्यावर त्याचा परिणाम होत आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही

पुणे : वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पर्यावरणाचा -हास होत असून झाडांची संख्या कमी होण्यावर त्याचा परिणाम होत आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही. मात्र, शहरातील झाडांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी गणेश कला-क्रीडा केंद्र येथे अचानक मुळापासून उन्मळून पडलेल्या झाडाला मुळ्याच नसल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे कोणीतरी हे झाड काढण्यासाठी जमिनीतील मुळ्या कापून ठेवल्या असल्याची शंका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत झाड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फक्त पावसाळ्यातच नव्हे तर, उन्हाळ्यातही या घटनांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. वाढते प्रदूषण आणि जमिनीची होणारी धूप, यातच मुळांना वाढण्यासाठी अपुरी जागा यामुळे झाडांना पोषणमूल्ये मिळत नाहीत. बांधकामांमध्ये झाडांसाठी काही जागा संरक्षित केली जाते. मात्र, झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुळ्या वाढण्यासाठी जमिनीखालीही माती नसते. तो भागही सिमेंटने बंद झालेला असतो. काही वर्षांपूर्वी अशाप्रकारे दिल्लीत फुटपाथवरील झाडांच्या वाढीसाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम सुरू केली होती. त्यांनी हे फुटपाथ उखडून त्या ठिकाणी नव्याने झाडे लावली होती. झाडांच्या वाढीला अशाप्रकारे जमिनीत मर्यादा पडू लागल्यास पुण्यातही नव्याने वृक्षारोपण सुरू करावे लागेल, असे मत वृक्ष संगोपन संशोधक महेश कदम यांनी व्यक्त केले. हिरवे झाड उन्मळून पडत नाही. जोपर्यंत त्यांच्या मुळांना धक्का लागत नाही, तोपर्यंत झाड मजबूत असते. मात्र, वादळ-वारा-वीज नसताना हे झाड पडले. या जमिनीच्या बाजूला खाणकाम केलेले असावे. झाडाची दुरवस्था झाली असल्यास सुरुवातीला झाडाच्या फांद्या किंवा वठलेला भाग पडतो. मात्र, असे काहीही नसताना पडलेल्या झाडासंदर्भात महापालिकेने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी वृक्षप्रेमी विनोद जैन यांनी केली.