शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

By admin | Updated: February 17, 2015 01:28 IST

पुरोगामी विचारवंत आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शहरातील विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

पिंपरी : पुरोगामी विचारवंत आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शहरातील विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध करीत पिंपरीत कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी सोमवारी दुपारी निदर्शने केली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आयटक, सिटू, श्रमिक एकता महासंघ, यूथ फेडरेशन, नागरी हक्क सुरक्षा समिती आदी संघटनांनी कॉम्रेड पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या वेळी माधव रोहम, शरद गोडसे, मानव कांबळे, विजय कदम, एल. एस. मारू, किशोर ढोकळे आदी उपस्थित होते. कामगार संघटनांनी लाल झेंडे फडकावीत, घटनेच्या विरोधात घोषणा दिल्या. कांबळे म्हणाले, ‘‘भ्र्रष्टाचाराविरुद्ध लढणारे सतीश शेट्टी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आता कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरील संकट अधिकच तीव्र झाले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच अशा घटना घडत आहेत. आम्ही काहीही करू शकतो; आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही, असा विश्वास या प्रतिगामी शक्तींना वाटू लागलाय.’’ हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पावले उचलावीत. त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या संघटनांनी केली.राष्ट्रीय समाज पक्षातर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि प्रवक्ते दीपक बिडकर निषेध व्यक्त करताना म्हणाले, ‘‘ही अत्यंत धक्कादायक घटना असून, पुरोगामी महाराष्ट्रात असे घडणे निषेधार्ह आहे. या प्रकरणातील हल्लेखोर तातडीने पकडावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करीत आहोत. विचार मांडणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपुढे अशा घटना मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात. राज्याची प्रतिमा धोक्यात येते. त्यामुळे हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे.’’कोल्हापूर येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. परिषदेचे शहराध्यक्ष संतोष लोंढे, उपाध्यक्ष रवींद्र माळी, आनंदा कुदळे, ज्ञानेश्वर मोंढे, पी. के. महाजन, काळुराम गायकवाड, मच्छिंद्र दरोडे, मंगलदास खैरनार, विश्वनाथ गांगुर्डे यांनी या हल्ल्याचा निषेध केला.