शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षकाला दोन वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: July 25, 2015 04:17 IST

तक्रारदारांच्या बाजूने तपास करून गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला

पुणे : तक्रारदारांच्या बाजूने तपास करून गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला २ वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंड, तर पोलीस नाईकला १ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सुनावली.सहायक पोलीस निरीक्षक गुलाब दस्तगीर इनामदार (वय ४३, रा. कात्रज) आणि पोलीस नाईक सुनील पंढरीनाथ पोकळे (वय ४७, रा. कोथरूड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. कोथरूड आझादनगर येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे. भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ) विवाहितेचा छळ करणेनुसार गुन्हा दाखल करेन, तसे करायचे नसल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्या वेळी तडजोडीअंती तक्रारदारांनी ४० हजार रुपये लाच दिली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांच्या पत्नीने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. त्या वेळी १० हजार रुपये लाच घेऊन पोलिसांनी दोघांत समेट घडवून आणला. वाद न मिटल्याने तक्रारदारांच्या पत्नीने तक्रारदार, आई आणि त्यांच्या तीन बहिणींविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्या वेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारदाराला अटक केली. त्यानंतर तक्रारदारांनी न्यायालयातून जामीन मिळविला. आई, तीन बहिणींना अटकपूर्व जामीन मिळाला. त्या वेळी पोलीस चौकीत हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानुसार तक्रारदार पोलीस चौकीत गेले. त्या वेळी पैसे दिल्यास गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवू, असे म्हणत २५ हजार रुपयांची लाच इनामदार याने मागितली. यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)