शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

झडती अंमलदारावर गुंडांच्या टोळीचा हल्ला

By admin | Updated: May 24, 2014 04:57 IST

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका झडती अंमलदारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने रस्त्यामध्ये गाठून त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढविला.

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका झडती अंमलदारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने रस्त्यामध्ये गाठून त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ‘कपडे काढून तपासणी करतो का?’ अशी विचारणा करीत हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. रमेश परशुराम धुमाळ (वय ४९, रा. येरवडा कारागृह कर्मचारी वसाहत) असे हल्ला झालेल्या झडती अंमलदाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कारागृह प्रशासन व पोलिसांकडून हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी हल्लेखोरांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात भादंवि १४३, ३५३, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुमाळ हे गेल्या दीड वर्षापासून येरवडा कारागृहामध्ये झडती अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ते ड्युटीवर आले होते. दुपारी नेहमीप्रमाणे ते घरी जेवायला चालले होते. कारागृहाच्या मागे कर्मचारी वसाहतीकडे जाणार्‍या रस्त्यावरून ते चालले होते. त्या वेळी दुचाक्यांवरून आलेल्या ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. त्यांच्या हातामध्ये असलेल्या हॉकी स्टिकने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना ‘कपडे काढून तपासणी करतो का?’ असे विचारणा हल्लेखोर करीत होते. दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार चालला. त्यानंतर त्यांनी लगेच तेथून पळ काढला. धुमाळ झडती घेत असताना कुण्या कैद्याने त्यांच्याशी वादावादी केली होती का, याचा शोध कारागृह प्रशासनाकडून घेतला जात आहे. लवकरच हल्लेखोरांना शोधून काढू, असे कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. येरवडा पोलिसांनी हल्लेखोरांचा माग काढत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)