शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा’ने पेलली कुटुंबाची जबाबदारी!

By admin | Updated: March 8, 2017 04:55 IST

खेड तालुक्यातील कान्हेवाडी येथील एका महिलेने दूध व्यवसायात भरारी घेत आपल्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर लीलया पेलली आहे. आशा रूके असे त्यांचे नाव असून कुटुंबाच्या हितासाठी

- तुषार मोढवे, चासकमानखेड तालुक्यातील कान्हेवाडी येथील एका महिलेने दूध व्यवसायात भरारी घेत आपल्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर लीलया पेलली आहे. आशा रूके असे त्यांचे नाव असून कुटुंबाच्या हितासाठी त्या वंशाचा दिवा बनल्या आहेत. चासकमान येथील आशा रूके यांनी मुलीही कुटुंबाची जबाबदारी स्वतंत्ररित्या पार पाडू शकतात हे सिद्ध केले आहे. घरामध्ये कुणाचेही पाठबळ नसतांना त्यांनी दूध व्यवसायाला सुरूवात केली. सुरूवातीला खडतर प्रवास करत अपयशाने खचून न जाता शेतीत राबवून दुग्ध व्यवसाय सांभाळला. त्यांच्याकडे आज सात जर्शी गायी असून दररोज ४० लिटर दुधाचे उत्पादन त्या घेत आहे. तसेच शेतीच्या कामासाठी तीन बैल आहेत. स्वत: घरातील पुरुषांचे पाठबळ नसतानाही स्वत: शेती करून दूधधंदा सांभाळत आहे. दररोज दूध काढून त्या स्वत: मोटार सायकल चालवून चार किमी अंतरावर कडधे, कान्हेवाडी आदी ठिकाणी खाजगी दूध सेंटरला घालत आहे. हा विषय कुतूहलाचा विषय ठरत आहे. आशा रूके या इतर महिलांप्रमानेच शेतीत काबाडकष्ट करताना ३ बहिणींचे लग्न त्यांनी केले व आईसोबत रहात आहे. घरात भाऊ नसताना ८ एकर कोरडवाहू शेती करून आईला सांभाळत आहे. मुलाला वंशाचा दिवा म्हणून ग्रामीण भागात आजही पाहिले जाते. परंतु, कान्हेवाडी येथील खेड्यात भाऊ नसलेले दु:ख न बाळगता स्वत: च्या मेहनतीने घराचा वारसा त्या चालवत आहे.घरामध्ये कुठल्याही पुरुषाचे पाठबळ नसताना स्वत: शेती करत शेतीला पाणी देणे, गाईच्या धारा काढणे व इतर सर्व कामे करीत असल्यामुळे सगळेच त्यांचे कौतुक करतात. (वार्ताहर)