शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

आशा कांबळेंना अटक, सुटका

By admin | Updated: May 21, 2014 01:05 IST

बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली.

पिंपरी : कष्टकरी महिलांचे विम्याचे हप्ते कंपनीत न भरता तीन लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे व त्यांची पत्नी आशा कांबळे (दोघेही रा. भक्ती कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी मंगळवारी आशा कांबळे यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली, तर बाबा कांबळे अद्यापही फरार आहे. फौजदार सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी छबिता रामचंद्र गलपलु (वय ४०, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद १६ जानेवारीला पिंपरी पोलिसात फिर्याद दिली होती. बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली. त्यांच्याकडे १२३ कष्टकरी महिलांनी विमा उतरविला. गलपुल या एजन्सीकडे एजंट म्हणून काम करीत होत्या. सुरुवातीला हप्त्याचे पैसे गोळा करून कांबळेने मुख्य कार्यालयात जमा केले. मात्र, फेबु्रवारी २०११ नंतर कांबळे दाम्पत्याने हप्त्याचे पैसे कंपनीला भरलेच नाही. त्यामुळे विम्याचे हप्ते रखडल्याचे महिलांना एलआयसीचे पत्र आले. यानंतर हा प्र्रकार उघडकीस आला. याबाबत तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार महिने उलटूनही पिंपरी पोलिसांना कांबळे दाम्पत्याचा शोध लागत नव्हता. अखेर मंगळवारी आशा कांबळे यांना अटक झाली. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. बाबा कांबळे अद्यापही फरार असल्याची माहिती निकम यांनी दिली. (प्रतिनिधी)