शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जल्लोषात बाप्पांचे आगमन

By admin | Updated: September 18, 2015 01:10 IST

बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त... त्याच्या आगमनासाठी त्यांनी केलेली जय्यत तयारी... बाप्पाला घरी आणताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा होणारा जयघोष

पुणे : बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त... त्याच्या आगमनासाठी त्यांनी केलेली जय्यत तयारी... बाप्पाला घरी आणताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा होणारा जयघोष आणि अखेर आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद... हे चित्र आज जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळाले. यंदा गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीमुळे सर्वांचा आवडता असणारा हा उत्सव किती उत्साहात साजरा होईल याबाबत साशंकता होती. परंतु मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि बाप्पाला पाऊस पाडण्याचे साकडे घालतच त्याचे स्वागत करण्यात आले. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात आणि थाटात आज बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण शहर ढोल-ताशाच्या गजराने दुमदुमत होते. सार्वजनिक गणेशमंडळांमध्येही सकाळपासूनच मिरवणुकीची गडबड चालू होती. यामुळे मागील अनेक दिवसांपासून बाप्पाची असलेली प्रतीक्षा आज अखेर संपली. पुढील दहा दिवसांसाठी आपल्यासोबत असणाऱ्या बाप्पासाठी मंडळांतर्फे आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पुण्यात मानाच्या गणपतींबरोबरच पुण्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे आराध्यदैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीचीही अतिशय दिमाखात स्थापना करण्यात आली. याबरोबरच मंडई, बाबूगेनु तरुण मंडळ आणि भाऊ रंगारी या गणपतींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशाच्या गजराने आसमंत दुमदुमला होता तर सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. (प्रतिनिधी)दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झाली असली तरी परतीचा मॉन्सून चांगला होईल, अशी आशा आहे़ सध्या दुष्काळाकडेच जास्त लक्ष देणार आहे़ पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे़ इतर मंडळांनीही प्रेरणा घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपावी़ - गिरीश बापट, पालकमंत्री